Maharashtra Talathi Bharti 2024-http://mahabhumi.gov.in

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकलेली तलाठी पदांची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत २ हजार ७११ जणांनी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी २१ जिल्ह्यांमधील ९८२ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली होती, तर आचारसंहितेनंतर १७२९ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदांची नियुक्ती अद्याप झाली नसली, तरी अन्य प्रवर्गातील नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांनी दिली. जून २०२३ मध्ये तलाठी पदांच्या ४ हजार ७९३ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर या पदांसाठी ४ हजार १८८ उमेदवारांची निवड करण्यात आली होती.
मात्र, पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील १३ जिल्ह्यांमधील निकाल राखून ठेवण्यात आला. पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनंतर २१ जिल्ह्यांमध्ये यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पेसा क्षेत्र वगळून अन्य २३ जिल्ह्यांमध्ये ९८२ जणांना नियुक्ती देण्यात आली होती.
पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातींव्यतिरिक्त १ हजार १४७ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. आचारसंहितेपूर्वी ९८२, तर आचारसंहितेनंतर १ हजार १४७ अशा एकूण २ हजार ७११ उमेदवारांना तलाठी पदावर रुजू होता आले आहे.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेले ’जैसे थे’ आदेश मागे घेतला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला. आहे. अश्विनी कोळसे, गोरखनाथ गव्हाणे व नितीन मगरे, योगेश्वरी चिंतामणी यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जांवर न्यायाधिकरणाने हा आदेश दिला. तलाठीपदी निवड होऊन नियुक्ती आदेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना या निकालाने मोठा दिलासा मिळाला. सामाईक परीक्षेच्या दुरूस्त उत्तर सुचीमुळे आपल्या गुणांकनावर विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे अंतिम निवड सूची रद्द करावी. त्यात आपल्या नावाचा समावेश करावा, अशी विनंती मुळ याचिकेत, अर्जात करण्यात आली होती. मनिषा कंगले व शुभम बहुरे या उमेदवारांनी न्यायाधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याविषयी दाद मागितली होती. मुंबई न्यायाधिकरणाने अशाच स्वरूपाच्या याचिकेत ’जैसे थे’ आदेश दिल्याने संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठी भरती ’जैसे थे’ ठेवण्याचा आदेश मॅटच्या खंडपीठाने 19 एप्रिल रोजी दिला होता. परिणामी, संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी पदाच्या नियुक्ती प्रक्रियेला ब्रेक लागला होता.
दरम्यान, मुंबई न्यायाधीकरणा समोरील प्रलंबित याचिकेत अंतिम सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांची याचिका मुख्य पीठाने खारीज केली. समान विषयासंबंधीची याचिका मुख्य पीठाने खारीज केल्याने छत्रपती संभाजीनगर येथील याचिका पण फेटाळण्यात यावी अथवा न्यायाधिकरणाने दिलेला ‘जैसे थे’ आदेश शिथील करण्यात यावा अशी विनंती ह्स्तक्षेप अर्जाद्वारे करण्यात आली होती. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास भरती प्रक्रिया अधिक लांबणीवर पडेल, तात्काळ पद भरती झाल्यास महसूल विभागावरील कामाचा बोजा कमी होईल, असा युक्तीवाद हस्तक्षेप अर्जदारांच्या वतीने करण्यात आला. सुनावणीअंती न्यायाधिकरणाने यापूर्वीचा स्थगिती आदेश मागे घेतला. मूळ अर्जाद्वारे दाद मागणार्या दोघा याचिकाकर्त्यांपुरती दोन पदे रिक्त ठेवून उर्वरीत 92 रिक्त जागांसाठी नियुक्ती आदेश जारी करण्यास कोणताही अडसर नसेल असे न्यायाधीकरणाने निकालात स्पष्ट केले. हस्तक्षेप अर्जदारांच्यावतीने ॲड, चैतन्य धारूरकर आणि ॲड महेश भोसले यांनी बाजू मांडली.
जिल्ह्यातील २४१ तलाठ्यांची पदे रिक्त असताना ‘पेसा’ क्षेत्रातील १० उमेदवारवगळता २३१ जणांच्या अंतिम निवडीसंदर्भात निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सोमवारी अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सोमवारी अंतिम निवडपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी दिली जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षी २४१ तलाठ्यांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला होता. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने २४१ मधील पेसा क्षेत्रातील १० जणांच्या भरती प्रक्रियाला वगळण्यात आले होते. त्यानंतर २३१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया गतकाळात राबविली गेली.
तर प्रतिक्षा यादीत १८६ जणांना स्थान देण्यात आले होते. २३१ जणांना कागदपत्रे तपासणीसह अन्य प्रक्रियेसाठी बोलाविल्यानंतर त्यातील ५७ जण गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील ५७ जणांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. जूनअखेरीस ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी निवड समितीच अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केली जाणार आहे त्यांनी मंजुरी दिल्यानंतर ही यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान नव्याने सेवेत दाखल होणाऱ्या सर्वच उमेदवारांचे कासार यांच्य मार्गदर्शनाखाली समुपदेशन केले जाणार आहे
प्रतीक्षा यादीही तयार
दरम्यान, या अंतिम निवड यादीतील काही उमेदवार अन्यत्र सेवेत दाखल झाल्याने ते रुजू होतील किंवा नाही, याविषयी प्रशासनाला साशंकता आहे. त्यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने संवर्गनिहाय प्रतिक्षा यादी तयार ठेवली आहे. या उमेदवारांच्या यादीसंदर्भात जिल्हाधिकारी सोमवारी निर्णय घेतील
Mahsul Vibhag Talathi Bharti 2024
तलाठी
भरती पेसा 1718 पदांकरिता नियुक्ती देण्यासाठी कोर्टाची मान्यता संदर्भातील कोर्ट ऑर्डर लिंक खाली दिलेली आहे. दिलेल्या PDF मध्ये आपण कोर्टाच्या आदेशाची माहिती बघू शकता. तलाठी भरती निकाल हा ११ जुलै रोजी प्रकाशित होणे अपेक्षित आहे, कारण शेवटची सुनावणी हि ११ जुलै रोजी होणार आहे.

तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निकाल लागून नऊ ते दहा महिने पूर्ण झाले आहेत. तरीही राज्यातील काही जिल्ह्यांतील तीन हजार ४०० तलाठ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे नियुक्ती आदेशापासून तलाठी बंचित आहेत. तीन ते चार वर्षानंतर तलाठी
भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबविली गेली आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे, मात्र त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे तलाठी वर्गात नाराजी पसरली आहे. पात्र तलाठ्यांचे समुदेशन करून लवकरात लवकर नियुक्ती आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. राज्यात जून २०२३ मध्ये चार हजार ४६६ जागांसाठी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ४४ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत, मात्र, बाकीच्या जिल्ह्यातील तीन ४०० तलाठ्यांना अद्यापही हजार नियुक्ती आदेश दिले नाहीत. त्या तलाठ्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
सोलापुरातील तलाठी आदेशापासून वंचित – तलाठी भरतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ११३ नवीन तलाठ्यांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये दिव्यांग बांधवांसह अनाथ व माजी सैनिक आरक्षणातून तलाठी पदभरती झाली आहे. त्यांना लवकरच नियुक्ती आदेश मिळणार आहेत.

आदिवासीबहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. निवडणूक आयोगाने तूर्तास लाल कंदील दाखवला आहे. मात्र, अन्य २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये ४ हजार ४६६ २१ जागांसाठी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पद भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे
सर्वाधिक रायगडमध्ये
- २३ जिल्ह्यांमधील २,४७९ निवड झालेल्या उमेदवारांपैकी १,४४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील १,०४४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे.
- सर्वाधिक १४१ तलाठी रायगड जिल्ह्यात, त्याखालोखाल ११३ सोलापूर जिल्ह्यामध्ये, वर्धेत ६३, नागपूरमध्ये ५३ आहेत.
- अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड व ठाणे या जिल्ह्यांमधील १ हजार ७०३ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे.
