Site icon

महत्वाचे! – किती महिलांच्या खात्यात आले लाडकी बहीण योजनेचे पैसे? इतरांच्या खात्यात कधी येणार, पूर्ण माहिती- Ladki Bahin Payment

Ladki Bahin Payment

आज महाराष्ट्रातील अनेक बहिणींना सरकार तर्फे खुशखबर मिळाली आहे. अनेक भगिनींना लाडकी बहीण योजनेचा प्रथम हप्ता ३००० रुपये थेट खात्यात मिळाला आहे.  मुख्यमंत्री म्हणाले,  लाडकी बहीण योजना आम्ही आणली. त्याचा आनंद आहे. आता 17 तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहोत. अनेक टीका झाल्या पण बुधवारी 35 लाख माय बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले. तसेच आज आणि उद्या 50 लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 1.25 कोटी महिलांच्या खात्यात महिन्याअखेर आम्ही पैसे देणार आहोत. राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे १७ ऑगस्ट २०२४ रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, १५ ऑगस्टच्या निमित्ताने राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ३५ लाख महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. तसेच महिन्याअखेर १.२५ कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात सिंहगड रोडवरील पुलाचे उद्घाटन गुरुवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आता १७ तारखेला पुण्यात मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. अनेक टीका झाल्या असल्या तरी बुधवारी ३५ लाख माय बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तसेच आज आणि उद्या ५० लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिन्याअखेर १.२५ कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वांदावी पाऊले’, असे आमचे सरकार आहे.

Exit mobile version